पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 'पत्रकार संवादिका' पुस्तिका, घडीपत्रिकेचे प्रकाशन

👤 सांगली | 📅 28 June 2026 | 👁 201 Views
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते  'पत्रकार संवादिका' पुस्तिका, घडीपत्रिकेचे प्रकाशन
जिल्हा माहिती कार्यालय, सांगली यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची घडीपत्रिका तसेच पत्रकारांसाठीच्या योजनांची माहिती देणाऱ्या 'पत्रकार संवादिका' या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.



जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पत्रकारांसाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्या तरी अनेकदा आवश्यक माहिती किंवा कागदपत्रांच्या अभावामुळे पात्र पत्रकारांना त्यांचा लाभ घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली ही पुस्तिका पत्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारी घडीपत्रिका नागरिकांना त्या विभागाच्या विविध योजनांची माहिती समजण्यास उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन केले.



पत्रकार संवादिकेत पत्रकारांसाठी शासन राबवत असलेल्या प्रमुख योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली असून, प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहितीही स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या प्रमुख योजनांची माहिती घडीपत्रिकेत देण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांचे प्रबोधन होण्यास मदत होईल.



कोल्हापूर विभागाचे उपसंचालक प्रवीण टाके यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून ही पुस्तिका तयार करण्यात आली असून, त्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व अनुसूचित जाती उपयोजना यांच्या निधीतून पुस्तिका व घडीपत्रिका तयार करण्यात आली आहे. कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी घडीपत्रिका तसेच, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी पत्रकार संवादिका पुस्तिकेच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. जिल्हा माहिती कार्यालयाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत, पत्रकार कल्याणासाठी ही पुस्तिका प्रभावी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |