कराड शहरातील बंटी बबलीला चोरीच्या गुन्ह्यात अटक; बस स्थानकातील चोरीचा गुन्हा उघड... दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

👤 कराड - प्रतिनिधी | 📅 27 June 2026 | 👁 206 Views
कराड शहरातील बंटी बबलीला चोरीच्या गुन्ह्यात अटक; बस स्थानकातील चोरीचा गुन्हा उघड... दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
कराड शहरातील बसस्थानक परिसरात महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या पती-पत्नीला कराड शहर पोलिसांनी अवघ्या एका दिवसात अटक करत गुन्ह्याची यशस्वी उकल केली. या कारवाईत आरोपींकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून, चौकशीत त्यांच्याकडून आणखी तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

राजेश कांबळे (वय ३३) व त्याची पत्नी पूनम श्रावण कांबळे (वय २७) दोघेही रा. कराड अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २२ जून रोजी रात्री सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला नवग्रह मंदिराकडून एसटी बसस्थानकाच्या दिशेने पायी जात असताना एका महिला व तिच्या साथीदाराने त्यांना अडविले. जीवे मारण्याची धमकी देत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून त्यांना ढकलून देत दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले होते. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यामध्ये संशयित महिला व पुरुष घटनास्थळाजवळ संशयास्पद हालचाली करताना आढळले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे श्रावण राजेश कांबळे व त्याची पत्नी पूनम श्रावण कांबळे यांना २३ जून रोजी अटक करण्यात आली.

पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या माहितीनुसार चोरीस गेलेले दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. पुढील तपासात या दोघांनी कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारचे आणखी तीन गुन्हे केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली असून, उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |