राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजही सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा – डॉ. एस. आर. कुलाळ

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 26 June 2026 | 👁 198 Views
राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजही सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा – डॉ. एस. आर. कुलाळ
जत, दि. २६राजे रामराव महाविद्यालय, जत येथील सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने लोककल्याणकारी राजे, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते व शिक्षणप्रेमी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. एस. आर. कुलाळ यांनी आपल्या मार्गदर्शनात राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. ते म्हणाले, "समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, समानता आणि न्याय पोहोचविण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले. त्यांच्या विचारांचा स्वीकार केल्याशिवाय समताधिष्ठित आणि प्रगत समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. आजच्या तरुणांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज आहे."
यावेळी त्यांनी शाहू महाराजांनी शिक्षण, आरक्षण, स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना डॉ. एस.आर. कुलाळ म्हणाले, "समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, समानता आणि न्याय पोहोचविण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले. त्यांच्या विचारांचा स्वीकार केल्याशिवाय समताधिष्ठित आणि प्रगत समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. आजच्या तरुणांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज आहे."
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचे कार्य हे आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचा भक्कम पाया असल्याचे सांगितले. "शिक्षण हीच सामाजिक परिवर्तनाची खरी शक्ती आहे, हा संदेश शाहू महाराजांनी कृतीतून दिला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे आचरण करून समाजहितासाठी कार्य केले पाहिजे," असे त्यांनी नमूद केले.
शेवटी प्रा. वैभव चांडवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |