अशी आहे सध्या धरणाची परिस्थिती

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 25 June 2026 | 👁 465 Views
अशी आहे सध्या धरणाची परिस्थिती
जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.28 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता 34.40 टीएमसी असून सध्या 32.8% पाणी साठले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली. जिल्ह्यातील इतर धरणांची स्थितीही समाधानकारक आहे. कोयना धरणात 13.97 टीएमसी, धोम 3.77 टीएमसी, कन्हेर 3.34 टीएमसी, उरमोडी 3.13 टीएमसी तर राधानगरीत 1.84 टीएमसी पाणीसाठा आहे. अलमट्टी धरणात 21.41 टीएमसी पाणी असून त्याची क्षमता 123 टीएमसी आहे. सध्या वारणा धरणातून 200 क्युसेक, कोयनातून 525 क्युसेक, अलमट्टीतून 868 क्युसेक विसर्ग सुरू आहे. राधानगरी, तुळशी, कासारी धरणातूनही विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सांगलीतील आयर्विन पुलावरील पाणी पातळी 7.3 फूट नोंदवली गेली आहे. असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |