आंतरराष्ट्रीय योग दिन सोलापूर जिल्हा कारागृहात साजरा

👤 अतुल फसाले | 📅 23 June 2026 | 👁 193 Views
आंतरराष्ट्रीय योग दिन सोलापूर जिल्हा कारागृहात साजरा

सोलापूर, द‍ि. 23 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोलापूर जिल्हा कारागृहात भारतीय योग संस्था, मुंबई यांच्या वतीने योग कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. योग हा शरीर आणि मन यांचा समतोल साधणारा प्रभावी मार्ग असून, निरोगी व शांततापूर्ण जीवनासाठी त्याचे विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहातील बंदी बांधवांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
पुरुष विभागामध्ये चंद्रकांत गव्हाणे व सिद्धेश्वर पाटील यांनी, महिला विभागामध्ये श्रीमती वैजयंती मेहंते व श्रीमती आनंदा जवळी यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक लाभ बंदी बांधवांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमास कारागृहातील अधिकारी, कर्मचारी तसेच बंदी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम महाराष्ट्र राज्य कारागृह व सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला. तसेच विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी अधीक्षक श्री बिरू एस. खळबुटे, तुरुंगाधिकारी निलेश गायकवाड, सुभेदार नामदेव भोसले, हवालदार निलकंठ खाडे तसेच इतर कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |