पंढरपूर आषाढी वारी २०२६ : नियमबाह्य ऑटो रिक्षा व मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई

👤 अतुल फसाले | 📅 23 June 2026 | 👁 153 Views
पंढरपूर आषाढी वारी २०२६ : नियमबाह्य ऑटो रिक्षा व मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई

सोलापूर, दि. 22 : आषाढी एकादशी महासोहळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांची वाहतूक व्यवस्था सुरक्षित, सुलभ आणि सुविहित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. वारीच्या काळात भाविकांची आर्थिक लूट रोखणे तसेच वाहतूक कोंडी टाळणे यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांनी कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

पंढरपूर शहर व परिसरात धावणाऱ्या ऑटो रिक्षांवर संयुक्त धडक मोहीम राबविण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

विनापरवाना वाहतुकीवर कारवाई : वैध चालक परवाना (Driving License) व परमिट नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून संबंधित वाहने जप्त करण्यात येतील.

मनमानी भाडे आकारणी सहन केली जाणार नाही : वारीदरम्यान प्रशासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या किंवा मनमानी पद्धतीने पैसे वसूल करणाऱ्या रिक्षा चालकांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात येतील.

नियमबाह्य व जादा प्रवासी वाहतुकीवर दंडात्मक कारवाई :
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक (Over-seating) करून नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

महत्वाची सूचना :
प्रशासनाने सर्व रिक्षा चालकांना वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, विमा (Insurance) आणि चालक परवाना सोबत बाळगणे बंधनकारक केले आहे. तसेच, निश्चित केलेले भाडेपत्रक (Tariff Card) प्रवाशांना स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे.

प्रवासी व वारकऱ्यांसाठी आवाहन :
प्रवासी व वारकऱ्यांनी कोणत्याही रिक्षा चालकाकडून जादा भाड्याची मागणी झाल्यास किंवा गैरवर्तन झाल्यास तात्काळ परिवहन विभागाच्या मदत कक्षाशी (0217-2303099) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी सर्व रिक्षा चालकांनी प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा, कोणतीही गय न करता परवाना रद्द करण्यासह कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ही माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |