शिवडाव माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु . नेहल मारुती शिवडावकर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 23 June 2026 | 👁 187 Views
शिवडाव माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु . नेहल मारुती शिवडावकर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम
पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्या भवन शिक्षण संकुल ,नेरूळ,नवी मुंबईच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त आयोजित केलेल्या 'राज्यस्तरीय निबंध स्पर्धा-२०२५'मध्ये आमच्या शिवडाव माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी नेहल मारुती शिवडावकर . इयत्ता ८ वी (२०२५-२६) ही सहभागी झाली होती . तिने ' माझ्या स्वप्नातील भारत ' या विषयावर उत्कृष्ट लेखन कौशल्य,विचार मंथन आणि सर्जनशील अभिव्यक्तीचे प्रदर्शन करून पहिल्या गटातून ( इ .५ वी ते ८ वी )राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे .तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिला रोख पारितोषिक ३०००,सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री . ज्ञानेश्वर म्हात्रे सर उपस्थित होते . तसेच नवी मुंबईच्या महापौर सौ .सुजाता पाटील उपस्थित होत्या .
नेहलच्या या यशाबद्दल शिवडाव सेवा संघ ,मुंबईचे अध्यक्ष श्री .मोहन पाताडे, कार्यवाह श्री .काशीराम गावकर तसेच शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यरेखा दळवी,खजिनदार श्री.कृष्णा गावकर,शालेय समितीचे सदस्य प्रा.श्री.विजय सावंत तसेच श्री.गणेश म्हसकर यांनी तिचे अभिनंदन केले .
तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री .मुकेश पवार तसेच शिक्षकवृंद, कर्मचारीवर्ग आणि पालकवर्ग यांनीही तिचे अभिनंदन केले .
तिला प्रशालेच्या मराठी विषय शिक्षिका सौ . रिया गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले .
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |