औदुंबर सेवा ट्रस्ट, नाधवडे मुंबई यांच्या वतीने शिडवणे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 June 2026 | 👁 178 Views
औदुंबर सेवा ट्रस्ट, नाधवडे मुंबई यांच्या वतीने शिडवणे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
औदुंबर सेवा ट्रस्ट, नाधवडे ( मुंबई ) यांच्या वतीने शिडवणे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*
कै. प्रभाकर कृष्णाजी नारकर आणि कै. सौ. सुलभा प्रभाकर नारकर यांच्या स्मरणार्थ 'औदुंबर सेवा ट्रस्ट, नाधवडे' यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, शिडवणे नं. १ येथे शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच रवींद्र शेट्ये यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने औदुंबर सेवा ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शाळेच्या वतीने सर्व पाहुण्यांना 'दत्त बावनी' पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी केले.
या प्रसंगी संतोष टक्के यांनी 'गुणवंत व्हा, कीर्तीवंत व्हा' हे प्रेरणादायी गीत गाऊन सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यानंतर जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माजी वित्त आणि बांधकाम सभापती रवींद्र जठार, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, विद्यानिधी स्कूलचे मुख्याध्यापक संतोष टक्के, सामाजिक कार्यकर्ते बंड्या मांजरेकर आणि महेश गोखले यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सर्व उपस्थित मान्यवरांनी औदुंबर सेवा ट्रस्टच्या या शैक्षणिक कार्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे मुक्तकंठाने कौतुक केले.
या सोहळ्याला औदुंबर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर नारकर, सचिव दीपक कुडतरकर, खजिनदार रुपेश कुडतरकर यांसह ट्रस्टचे पदाधिकारी रमाकांत पांचाळ, प्रदीप कुडतरकर, श्रीरंग पावसकर, विजय तावडे, रवींद्र खांडेकर, प्रफुल्ल घाडी, योगेश शेट्ये, रोनक पावसकर, अंकित शेट्ये, संतोष सावंत, योगेश घाडी, विशाल पावसकर, प्रकाश नारकर, महादेव शेट्ये, परशुराम इस्वलकर आणि अनिल नारकर उपस्थित होते.
यावेळी शाळेतील पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी, उपशिक्षक सुरेंद्र यादव, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य गायत्री वाघरे, अरविंद धाक्रस, अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर, मदतनीस कविता केतकर यांच्यासह पालक सदाशिव कुडतरकर, सचिन टक्के, निशा कुडतरकर, मानसी रांबाडे, समीक्षा सुतार, उमेश मेस्त्री आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपशिक्षिका वेदिका चव्हाण यांनी आभार मानले. या मोफत वह्या वाटप उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा आनंद दिसून आला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |