आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची बैठक संपन्न

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 June 2026 | 👁 152 Views
आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची बैठक संपन्न
व्यापारी महासंघाने व्यवसायात येणाऱ्या मांडल्या समस्या : आमदार प्रमोद जठार यांना दिले निवेदन
कुडाळ सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ गेल्या ३५ वर्षापासुन जिल्ह्यातील लहान व मोठ्या व्यापारी उद्योजकांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत आहे. व्यापारी बांधवाच्या विविध अडचणी सोडवुन त्यांना योग्य न्याय मिळवुन देण्यासाठी महासंघ कायम प्रयत्नशिल राहीला आहे.आमदार प्रमोद जठार यांनी कुडाळ येथे व्यापारी महासंघ यांची भेट घेऊन त्यांना व्यापारत येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी व्यापारी महासंघाच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग नगरी येथे व्यापारी बांधवांसाठी एक सुसज्य व्यापारी भवन व्हावे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांच्या प्रत्येक नाक्यावर तसेच महामार्गावर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याबाबत यावेत, सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात .त्यामुळे जागोजागी पर्यटन स्थळांवरती कच-याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर आढळते. तरी आपल्या आमदार निधीतून ओल्या व सुका कचरा गोळा करण्यासाठी कचरा कुंडया संपुर्ण जिल्हयात पुरविण्यात याव्यात, सद्या संपुर्ण जिल्हयात विज महावितरण कडुन स्मार्ट मिटर बसविण्याची सक्ती ग्राहकांना केली जाते. मा.मुख्यमंत्री यांनी याबाबत सक्ती करु नये असे आदेश दिलेले असताना सुद्धा जबरदस्ती स्मार्ट मिटर बसविण्याचे काम सुरु आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही होणेसाठी आपण प्रयत्न करावे, परप्रांतीय फिरत्या व्यापा-यांपासुन जिल्ह्यातील स्थानिक किरकोळ विक्रेत्या व्यापा-यांना नुकसान होत आहे. फिरत्या व्यापा-यांना प्रशासनाकडुन ओळखपत्रे देण्यात यावी तसचे स्थानिक व्यापा-यांप्रमाणे कर आकारणी, वजन काटे, अन्नसुरक्षा प्रमाणपत्र याबाबत सक्ती करावी, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-यांना ज्याप्रमाणे विमा सुरक्षा कवच दिले जाते त्याप्रमाणे व्यापारी बांधवांना सुद्धा नैसर्गिक आपत्तीमध्ये (दुकानाला आग लागणे, वादळ आणि पुराचे पाणी पासुन होणारे नुकसान, चोरीपासुन होणारे नुकसान) यासाठी विमा संरक्षण मिळावे, शासन निर्णयानुसार पर्यटन उद्योगाखाली हॉटेल इंडस्ट्रीजला उद्योगाचा दर्जा देण्याबाबत जीआर प्रसिद्ध केला आहे. मात्र या इंडस्ट्रीजला केली जावी, ही प्रमुख मागणी सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यातील सर्व हॉटेल इंडस्ट्रीजची आहे अश्या विविध मागन्यांचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांना देण्यात आले. यावेळी आमदर प्रमोद जठार यांनी आपण व्यापारी महासंघाच्या पाठीशी असल्याने तुमच्या समस्यांचे येत्या काळात निरसरण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, कार्यवाह राजू जठार, उपाध्यक्ष दीपक भोगले, पुंडलिक दळवी, अवधूत शिरसाट, सहकार्यवाह राजन नाईक आदी जिल्हा व्यापारी महासंघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |