तृणमूल काँग्रेसमध्ये जसा अभिषेक बॅनर्जी, तसाच उबाठामध्ये आदित्य ठाकरे ऑपरेशन टायगरवरून आदित्य ठाकरे यांच्यावर मंत्री नितेश राणेंचा निशाणा

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 June 2026 | 👁 148 Views
तृणमूल काँग्रेसमध्ये जसा अभिषेक बॅनर्जी, तसाच उबाठामध्ये आदित्य ठाकरे  ऑपरेशन टायगरवरून आदित्य ठाकरे यांच्यावर मंत्री नितेश राणेंचा निशाणा
ऑपरेशन टायगर’ प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत पक्षातील खासदार का सोडून गेले, याचे उत्तर त्यांनी द्यावे असे म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये जसा अभिषेक बॅनर्जी आहे, तसाच उबाठामध्ये आदित्य ठाकरे आहे. ‘ऑपरेशन टायगर’बाबत बोलण्यापूर्वी याचा जबाबदार कोण, याचाही विचार झाला पाहिजे. आदित्य ठाकरे असताना त्यांच्या पक्षातील खासदार का सोडून गेले, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या तयारीत होता, अशी भीती अनेक खासदारांना वाटत होती. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा स्वीकार केला, असा दावा राणे यांनी केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसविरोधी विचारांवर शिवसेना उभी केली होती. मात्र त्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे काँग्रेसच्या जवळ गेले, असा आरोप त्यांनी केला. संजय राऊत यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आधी आत्मपरीक्षण करावे. शिवसेनेने घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांच्या विचारांना न्याय देण्यासाठी आहे.उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत राणे म्हणाले की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा आता काहीही संबंध राहिलेला नाही.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |