कणकवली पोलिसांची धडक कारवाई!

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 June 2026 | 👁 188 Views
कणकवली पोलिसांची धडक कारवाई!
पहाटेच्या सापळ्यात 68 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा पकडला
पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूची मोठी वाहतूक उधळून लावत तब्बल 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करी करणाऱ्यांचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार,खारेपाटण चेकपोस्टवर पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वाहनांची तपासणी सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम (ब.नं 1233),पोलीस कॉन्स्टेबल उद्देश कदम (ब.नं . 1238) तसेच होमगार्ड गोपाळ लोके यांनी संशयित गुजरात पासिंगच्या आयशर टेम्पोची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनातील माल संशयास्पद वाटल्याने याबाबतची माहिती खारेपाटण दूरक्षेत्राचे अंमलदार श्री.मिलिंद देसाई यांना देण्यात आली.
देसाई यांनी मालाची खात्री केल्यानंतर तो गोवा बनावटीच्या दारूचा साठा असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर त्यांनी ही माहिती ठाणे अंमलदार तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.तेजस नलावडे यांना कळविली.वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक शेडगे यांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली व संबंधित वाहन कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
तपासणीमध्ये आयशर टेम्पोमधून सुमारे 48 लाख रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूचे 1,000 बॉक्स आढळून आले.तसेच 20 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त करण्यात आला.अशा प्रकारे एकूण 68 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी वाहन चालक अर्जिराम गुलाराम गोदारा (वय 24) व क्लीनर मुकेश खिमाराम पंडित (वय 29),दोघेही राजस्थान येथील रहिवासी, यांना ताब्यात घेण्यात आले असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. शेडगे करीत आहेत.
ठळक बाब म्हणजे
खारेपाटण चेकपोस्टवरील सतर्क पोलीस कर्मचाऱ्यांमुळे गोवा बनावटीच्या दारूची मोठी तस्करी उधळून लावत कणकवली पोलिसांनी 68 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |