पोलीस आयुक्त एम. राजकुमार साहेब यांनी केले अंबिका नगर च्या विध्यार्थ्यांचे स्वागत

👤 अतुल फसाले | 📅 19 June 2026 | 👁 212 Views
पोलीस आयुक्त एम. राजकुमार साहेब यांनी केले अंबिका नगर च्या विध्यार्थ्यांचे स्वागत
पोलीस आयुक्त एम. राजकुमार साहेब यांनी केले अंबिका नगर च्या विध्यार्थ्यांचे स्वागत

सोलापूर - शाळेच्या प्रथम दिवसा निमित्त प्रवेशोत्सव मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिका नगर ता. उत्तर सोलापूर च्या विध्यार्थ्याचे स्वागत सोलापूर चे पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार साहेब यांनी केले.अत्यन्त उत्साहपूर्ण वातावरणात हे कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी नगरसेविका सौ अलका आनंद भवर फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत श्री आनंद भवर पोलीस उपनिरीक्षक सतीश बावणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ लक्ष्मी कनकधर उपाध्यक्ष प्रज्ञा राऊत मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त माननीय श्री एम राजकुमार म्हणाले आपल्याला जीवनात मोठे होण्यासाठी भरपूर अभ्यास करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकांना मित्र बनवले पाहिजे. पुस्तकांशी मैत्री करून सरकारी शाळेत शिकून अनेकजण मोठ्या हुद्यावर काम करत आहेत.
विद्यार्थ्यांमधील उत्साह शाळेचा हिरवागार परिसर प्रवेशोत्सवानिमित्त आनंदी वातावरण हे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम संधी निर्माण करते. याचे महत्त्व विद्यार्थ्यांना आज कळणार नाही परंतु वयाने मोठे झाल्यावर आजच्या दिवसाचे महत्व त्यांना नक्की कळेल.
यावेळी पहिलीच्या विध्यार्थ्यांना शालेय साहित्य, स्कुल बॅग, गणवेश, शूज व पाठ्य पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी विध्यार्थ्यांना सजविलेल्या जीप मधून विध्यार्थी मिरवणूक काढण्यात आली. विध्यार्थ्यां वर पुष्पवृष्ठी व औक्षण करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्याना गणवेश, पाठ्य पुस्तक वाटप करण्यात आले.आनंद भंवर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्याना वह्या वाटप करण्यात आले.
आनंद भंवर व इतर मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद सोलापूर चे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री कादर शेख व शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांनीही उपस्थित राहून विध्यार्थ्यांना साहित्य वाटप केले व नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सिद्धाराम माशाळे यांनी केले. सूत्रसंचालन शिवशंकर राठोड यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती रसिका बंदिछोडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दीपक काळे, श्रीमती वैशाली गोंदकर, श्रीमती विद्या वरडुळे, शिवाजी वडते यांनी परिश्रम घेतले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |