अन्नभेसळ माफियांनी घेतला धसका: तुकाराम मुंढे यांच्या 'धडाकेबाज' कारवाईने तासगावसह राज्यभरात खळबळ

👤 संतोष एडके तासगाव | 📅 16 June 2026 | 👁 317 Views
अन्नभेसळ माफियांनी घेतला धसका: तुकाराम मुंढे यांच्या 'धडाकेबाज' कारवाईने तासगावसह राज्यभरात खळबळ
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील मेडिकल मधील औषधांच्या बाबतीतही जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन डॉक्टरांची सक्ती स्वतःच्याच दवाखान्याच्या मेडिकल मधून औषधे घेतली पाहिजे या सक्तीच्या विरोधात निर्णय घेतला की यापुढे डॉक्टर ना अशी सक्ती करता येणार नाही व ठराविकच कंपनीची,ब्रँडची चे औषधी घ्या असेही त्यांना लिहिता येणार नाही. तंबाखूजन्य घटक अर्थातच गुटखा तसेच अन्न -पदार्थाशी निगडित भेसळ करणाऱ्या माफियांमध्ये अक्षरशः दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दूध, डेअरी उत्पादने, बेकरी पदार्थ, खाद्यतेल यामधील भेसळ रोखण्यासाठी त्यांनी राज्यभर सुरू केलेल्या धडक मोहिमेने भ्रष्ट व्यवस्थेला हादरे दिले आहेत. या कारवाईचा विशेष परिणाम तासगाव तालुक्यातही उमटताना दिसत आहे.

​'भेसळमुक्त' मोहिमेचा परिणाम: बाजारपेठेतून गायब झाले संशयास्पद पनीर

​आयुक्त मुंढे यांच्या कठोर कारवाईनंतर बाजारपेठेत मोठा बदल दिसून येत आहे. दुधाच्या विक्रीत झालेली घट आणि तासगावच्या बाजारपेठेतून अचानक पनीर गायब होणे, यावरून आपण आजवर नक्की काय खात होतो, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. आता कारवाईच्या भीतीने ही भेसळयुक्त उत्पादने बाजारातून गायब झाल्याने, 'याआधी आम्ही अन्न खात होतो की विष?' असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.

तासगाव शहरासह तालुक्यातील अनेक पान टपऱ्या बंद.

तासगाव शहरासह तालुक्यामध्ये सर्वत्र सहज मिळणारा मावा -गुटखा जवळजवळ मिळेनासा झाला आहे, तर अद्याप काही ठिकाणी लपून-छपून विक्री होताना दिसून येत आहे त्यावरही प्रभावीपणे कारवाई होणे गरजेचे आहे असे नागरिकांच्यातून बोलले जाते.

​२१ वर्षांत २५ बदल्या: भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घातल्याची शिक्षा?

​तुकाराम मुंढे यांची प्रशासकीय कारकीर्द ही त्यांच्या शिस्तबद्ध आणि धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखली जाते. गेल्या २१ वर्षांच्या सेवेमध्ये त्यांच्या तब्बल २५ वेळा बदल्या झाल्या आहेत. मुंढे ज्या ज्या खात्यात जातात, तिथे भ्रष्टाचार मुळापासून संपवण्याचा आणि अवैध कामे बंद करण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करतात. मात्र, त्यांची ही पारदर्शकता आणि 'झिरो टॉलरन्स' धोरण नेहमीच सत्ताधारी आणि राज्यकर्त्यांना खटकत आले आहे. याच कारणामुळे त्यांना वारंवार बदलीच्या शिक्षेला सामोरे जावे लागते, असा स्पष्ट आरोप आता जनसामान्यांतून होत आहे.

​ बदली होणार का? नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

​मुंढे यांनी अवघ्या काही दिवसांत राज्यभरात जी धडक कारवाई सुरू केली आहे, त्यामुळे भ्रष्ट माफियांना घाम फुटला आहे. परंतु, त्यांचा इतिहास पाहता, आताही हीच परिस्थिती उद्भवणार का? त्यांना याही वेळी राजकीय दबावामुळे बदलीला सामोरे जावे लागणार का? असा तीव्र प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. पारदर्शक आणि कार्यक्षम अधिकारी राज्यकर्त्यांना नको आहेत का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
​प्रशासकीय निष्क्रीयतेवर नागरिकांचा रोष
​एका महिन्याच्या आत एवढा मोठा बदल घडून येतो, तर यापूर्वीच्या प्रशासनाने नेमके काय केले? असा तिखट सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक नागरिकांचे असे मत आहे की, "जर तुकाराम मुंढे यांच्यासारखा कार्यक्षम अधिकारी राज्याचे नेतृत्व करू शकला, तर महाराष्ट्रात नक्कीच क्रांतिकारक बदल घडतील."
​नागरिकांची मागणी: 'मुंढे यांना काम करू द्या'
​तासगावच्या गल्लीबोळातील चर्चेत आज तुकाराम मुंढे यांच्या कारवायांचीच चर्चा आहे. आरोग्यदायी महाराष्ट्र घडवण्यासाठी मुंढे यांना मुक्तहस्त द्यावा आणि त्यांची बदली न करता त्यांना त्यांचे काम पूर्ण करू द्यावे, हीच आता महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य नागरिकाची मायबाप सरकारकडे आग्रही मागणी आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |