सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी प्रदिप सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन

👤 तुषार शिंगाडे सिंधूदुर्ग | 📅 14 June 2026 | 👁 246 Views
सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी प्रदिप सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन
तरंदळे-खोतवाडी येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी प्रदिप श्रीधर सावंत (७२) यांचे नुकतेच मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रदिप सावंत यांनी आपल्या सेवाकाळात आरवली, अचिर्णे, वैभववाडी, मसुरे, ओरोस आणि दोडामार्ग अशा विविध ठिकाणी उल्लेखनीय सेवा बजावली होती. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणींना नेहमी धावून जाण्याच्या वृत्तीमुळे ते शेतकरी वर्गात अत्यंत लोकप्रिय होते. तरंदळे गावाच्या विकासातही त्यांचा मोठा सहभाग होता. जिल्ह्यात पशुधन वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेऊन, सन २००३ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष गौरव देखील केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. इंडियन आर्मीमधील मेजर आशिष सावंत यांचे ते वडील होत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |