राज्यस्तरीय आट्यापाट्या पंच परीक्षेत कासार्डेच्या तिघांचे घवघवीत यश

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 12 June 2026 | 👁 160 Views
राज्यस्तरीय आट्यापाट्या पंच परीक्षेत कासार्डेच्या तिघांचे घवघवीत यश
महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ, नागपूर व अमरावती आट्यापाट्या असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आट्यापाट्या पंच परीक्षेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड तसेच राज्यस्तरीय आट्यापाट्या खेळाडू दुर्वेश गोसावी व मयुरेश नारकर यांनी उल्लेखनीय यश संपादन करून कासार्डे परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.सलग दोन दिवस चाललेल्या या राज्यस्तरीय पंच परीक्षा व कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडू, प्रशिक्षक व पंच सहभागी झाले होते. परीक्षेदरम्यान आट्यापाट्या खेळाचे अद्ययावत नियम, पंचांचे कर्तव्य, स्पर्धा व्यवस्थापन तसेच खेळातील तांत्रिक बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या परीक्षेसाठी आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय पंच अमरकांत चकोले,शरद गव्हार आणि महेंद्र काळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीधर धाकुलकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते सर्वेश मेन यांनीही आपल्या अनुभवाच्या आधारे मौल्यवान मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे परीक्षार्थींना पंच म्हणून आवश्यक असलेल्या कौशल्यांची प्रभावी माहिती मिळाली.दत्तात्रय मारकड, दुर्वेश गोसावी व मयुरेश नारकर यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आट्यापाट्या खेळाला नवी प्रेरणा मिळणार आहे.
या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. अमरकांत चकोले, उपाध्यक्ष डॉ. श्रीधर धाकुलकर, डॉ. नितीन चव्हाळे तसेच विविध मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कासार्डे विकास मंडळ मुंबई सर्व पदाधिकारी तसेच कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ.बी.बी.बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही राणे,शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनीही यशस्वी पंचाचे अभिनंदन केले आहे.राज्यस्तरीय पंच परीक्षेत मिळालेल्या या यशामुळे भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील आट्यापाट्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून, कासार्डेच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.विशेष बाब म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पंच होण्याचा मान या तीघांना मिळाला आहे. या तिन्ही राज्य पंचाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |