जिद्द, कर्तृत्व आणि समाजसेवेचा गौरव! प्रा. अश्विनी काळे यांना राज्यस्तरीय 'आदर्श समाज रत्न पुरस्कार' प्रदान

👤 राहुल खरात पुणे | 📅 11 June 2026 | 👁 79 Views
जिद्द, कर्तृत्व आणि समाजसेवेचा गौरव! प्रा. अश्विनी काळे यांना राज्यस्तरीय 'आदर्श समाज रत्न पुरस्कार' प्रदान
शैक्षणिक, साहित्य आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या 'अश्वमेध आयएस अकॅडमी'च्या संस्थापिका प्रा. अश्विनी शिवाजी काळे यांना यंदाचा प्रतिष्ठित 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. ७ जून २०२६ रोजी पुणे येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
प्रा. अश्विनी काळे यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवतानाच साहित्य आणि कला क्षेत्रातही आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला आहे. जिद्द, चिकाटी आणि समाजाभिमुख कार्याच्या बळावर त्यांनी उभारलेले कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल घेत राज्यस्तरीय 'आदर्श समाज रत्न पुरस्कार'ासाठी त्यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर पुणे येथे झालेल्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा राष्ट्रभक्ती परिवार, शेखर जगन्नाथ तुपे सामाजिक व शैक्षणिक संस्था आणि प्रहार युथ ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सौ. भारती रमेश तुपे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रभक्ती महिला संघटना), श्री. सुनील सुरेश गोरे (अध्यक्ष, राष्ट्रभक्ती परिवार) आणि श्री. राजेंद्र श्रीरंग पवार (अध्यक्ष, अष्टविनायक मित्र मंडळ ट्रस्ट) यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रा. काळे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सन्मानपत्रात नमूद करण्यात आले की, "तुमच्या अंगी असलेली जिद्द आणि कार्यरत असलेल्या क्षेत्रातील अमूल्य योगदानामुळे समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे. तुमचा हा प्रेरणादायी प्रवास असाच अखंड सुरू राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना."
प्रा. अश्विनी काळे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशामुळे अश्वमेध आयएस अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६ ने ज्येष्ठ शिक्षिका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचा गौरव.. | ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग |