रासपचे दहिवडी महावितरण उपविभागीय कार्यालयासमोर १५ जून ला घंटानाद आंदोलन

👤 आकाश दडस सातारा | 📅 11 June 2026 | 👁 123 Views
रासपचे दहिवडी महावितरण उपविभागीय कार्यालयासमोर १५ जून ला घंटानाद आंदोलन
मोगराळे आणि शिंगणापूर सह माण तालुक्यातील सर्वच परिसरातील अघोषित आणि अनियंत्रित वीज भारनियमन (लोडशेडिंग) तात्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) वतीने दहिवडी येथील उपविभागीय महावितरण कार्यालयासमोर तीव्र 'घंटानाद आंदोलन' करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शरद दडस यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोगराळे आणि शिंगणापूर परिसर व माण तालुक्यातील इतर ठिकाणी वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतकरी, व्यापारी, दूध उत्पादक पशुपालक, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. ऐन गरजेच्यावेळी वीज गायब होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे, तसेच घरगुती ग्राहकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. ⁠महावितरणच्या या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ऊर्जामंत्री यांना पत्र देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधाकडे दुर्लक्ष केले जात आहे. गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि झोपलेल्या महावितरण अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाला आता आंदोलनाचे हत्यार उपसन्याशिवाय पर्याय नाही. मोगराळे, शिंगणापूर तसेच माण तालुक्यातील भारनियमन तातडीने थांबवले नाही, तर दहिवडी येथील उपविभागीय कार्यालयावर दिनांक १५ जून २०२६ रोजी घंटानाद करून प्रशासनाचा निषेध केला जाईल, असा इशारा शरद दडस यांनी दिला आहे. या आंदोलनात परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |