प्रा.डॉ.अनुराधा जानकर यांना शिर्डी येथे 'राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार' प्रदान!

👤 आकाश दडस सातारा | 📅 11 June 2026 | 👁 122 Views
प्रा.डॉ.अनुराधा जानकर यांना शिर्डी येथे 'राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार' प्रदान!
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि मराठी साहित्याचा गाढा अभ्यास असणाऱ्या दहिवडी कॉलेजच्या प्रा. डॉ. सौ. अनुराधा जानकर यांना ‘बी द चेंज फाउंडेशन, कोपरगाव’ यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. शिर्डी येथे दिनांक ७ जून २०२६ रोजी आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात कर्नल भंडारी यांच्या शुभहस्ते डॉ. जानकर यांना हा गौरव प्राप्त झाला.
प्रा. डॉ. अनुराधा जानकर या गेल्या १५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात अविरतपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. सध्या त्या दहिवडी कॉलेजमध्ये कार्यरत असून, त्यांनी आपल्या अध्यापन कौशल्याने अनेक विद्यार्थी घडवले आहेत. अत्यंत बिकट आणि स्पर्धात्मक क्षेत्रात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.
डॉ. जानकर यांचे मराठी विषयावर प्रचंड प्रभुत्व असून त्यांनी पीएच.डी. (Ph.D.), सेट (SET), आणि नेट (NET) या उच्च शैक्षणिक पदव्या संपादन केल्या आहेत. केवळ अध्यापनच नव्हे, तर संशोधन क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. विविध नामवंत लेखकांच्या पुस्तकांची अभ्यासपूर्ण समीक्षा केली आहे.वेगवेगळ्या जर्नलस मध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.शिर्डी येथील या सोहळ्याला अनेक मान्यवर आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. डॉ. अनुराधा जानकर यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्कारामुळे दहिवडी कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण सातारा जिल्ह्यातून आणि शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |