जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने तळेरे स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 88 Views
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने तळेरे स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण
स्मशानभूमी परिसर सुशोभित आणि हरित परिसर बनविण्यासाठी सरपंच हनुमंत तळेकर यांचा प्रयत्न
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने तळेरे स्मशानभूमी परिसरात सावली व फळे देणाऱ्या विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. स्मशानभूमी परिसर सुशोभित आणि हरित परिसर बनविण्यासाठी निसर्गप्रेमी सरपंच हनुमंत तळेकर यांचा ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न करत आहेत.
तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर यांनी आपल्या कारकिर्दीत चांगल्या कामांसोबतच सर्वांगीण विकास आणि स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी विशेष पावले उचलली आहेत. वृक्षारोपण करून वृक्षलागवड करणे आवश्यक असल्याने तळेरे येथील श्री देव गांगेश्वर मंदिर देवराई परिसर आणि तळेरे स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करुन त्यांचे संरक्षण, संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
यावर्षी देखील या उपक्रमाला आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज तळेरे स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच त्यांना आवश्यक सेंद्रिय खत देऊन संरक्षक लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. त्यामुळे वृक्षसंपदेत वाढ होऊन स्मशानभूमी परिसर हरित होण्यास मदत होणार आहे.
आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, ग्रामविकास अधिकारी सौ.राजलक्ष्मी जाधव, माजी पं.स.सभापती दिलीप तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, ग्रा.प.सदस्य सागर डंबे, माजी उपसरपंच शशांक तळेकर, शैलेश सुर्वे,सौ.तळेकर, सौ.चव्हाण, सुयोग तळेकर, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश सोरप, डॉ.धनश्री जाधव, ग्रा.प.कर्मचारी बाबू मेस्त्री, नंदू देसाई व इतर तसेच आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आणि कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाटचे विद्यार्थी अरिहंत अंकलखोपे, आदर्श कोरे, संग्राम पाटील, रोहित देशपांडे, शर्विल पाटील, प्रतिक मोरस्कर, हर्षल पालये, तन्मय पालये, हिमांशू राणे, ओंकार सुतार आदी विद्यार्थी सहभागी झाले होते.
वृक्षारोपण उपक्रमांमध्ये फोंडाघाट येथील कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच निसर्ग मित्र परिवार आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.

फोटो:- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेरे स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करताना तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, दिलीप तळेकर, ग्रामविकास अधिकारी सौ.राजलक्ष्मी जाधव व कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व ग्रामस्थ.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |