एलएलबी परीक्षेत मैथिली बगळे हिचे यश

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 123 Views
एलएलबी परीक्षेत मैथिली बगळे हिचे यश
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला मैथिली बगळे हिचा सत्कार
कणकवली कनकनगर येथे राहणारी, कणकवलीची सुकन्या मैथिली निकिता निळकंठ बगळे हिने कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेज येथून विधीतज्ञ अर्थात ॲडव्होकेट ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत कौतुकास्पद यश प्राप्त केले आहे. मैथिलीच्या या यशाबद्दल समीर नलावडे संपर्क कार्यालयात माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी तिचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.मैथिली बगळे हिचे दहावीपर्यंत शिक्षण वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूल येथे झाले. त्यानंतर तिने मुंबई रुपारेल कॉलेज येथे आपले बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. कायदेविषयात जास्त ओढा असल्याने मैथिली हिने कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेज येथे एलएलबीसाठी प्रवेश घेतला. काही दिवसापूर्वी जाहीर झालेल्या निकालात मैथिलीने प्रथम श्रेणीत एलएलबी पदवी उत्तीर्ण होत कौतुकास्पद यश प्राप्त केले.
वकिली परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मैथिलीने एलएलएम अभ्यासाची तयारी सुरू केली आहे. मैथिली हिचे वडील निळकंठ बगळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे पोलीस निरीक्षक असून मैथिली तिची आई दारिस्ते जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिका आहे. मैथिलीच्या या यशाबद्दल तिचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.
यावेळी समीर नलावडे यांनी मैथिली बगळे हिचे कौतुक करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |