नव्या शैक्षणिक धोरणानुसार सुधारणात्मक उपक्रमांतून विद्यार्थी घडविणारी विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 91 Views
नव्या शैक्षणिक धोरणानुसार सुधारणात्मक उपक्रमांतून विद्यार्थी घडविणारी विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला
नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेने विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची वर्षभराची नियोजनबद्ध आखणी केली आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरात वाढ होण्यासाठी तसेच संस्कारित व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी प्रशालेत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचे मूल्यमापन करून सर्व विषयांची चाचपणी करण्यात आली. त्यानंतर अध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या जाणीवा व आकलन क्षमता विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. प्रथम पालक सभा आयोजित करून शैक्षणिक उपक्रम आणि पाठ्यक्रम यांची सांगड घालण्यात आली. सर्व विषयांचा पायाभूत व पूरक अभ्यासक्रम इयत्तानिहाय नियोजनपूर्वक राबविण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले.

भाषा विषयांमध्ये पूरक वाचन आणि उपयोजित लेखन या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषेची अभिरुची निर्माण झाली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या विषयांतील अध्ययन स्तर उंचावला असून मुक्त विद्यापीठाच्या बाह्य परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांची प्रगती दिसून येत आहे. शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना भाषिक तयारी करण्यास या उपक्रमांचा मोठा लाभ होत आहे.

गणित विषयातील संबोध परीक्षा व प्राविण्य परीक्षा हे महत्त्वाचे उपक्रम ठरत आहेत. सकाळी व सायंकाळी अतिरिक्त मार्गदर्शन वर्गांच्या माध्यमातून मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर होऊन विषयाविषयीची आवड वाढत आहे.

कला रसास्वाद या उपक्रमांतर्गत मातीकला, मूर्तीकला, कोलाज, चित्रकला, संगीत, संगणक प्रशिक्षण, शारीरिक शिक्षण तसेच विविध खेळांचे मार्गदर्शन दिले जाते. याशिवाय बागकाम, पर्यावरण जागृती, स्वच्छता व आरोग्य शिक्षण, योगाभ्यास आदी उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्यांचा विकास साधला जात आहे.

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी सातत्याने कार्यरत असून या प्रयत्नांमुळे बालवाडी, मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम ते दहावीपर्यंत प्रवेशक्षमतेत वाढ होत आहे. अनुभवी व समर्पित अध्यापकांचे मार्गदर्शन हा प्रशालेचा विशेष ठेवा आहे. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षण आणि सुरक्षेसाठी प्रशाला सदैव कटिबद्ध असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |