असलदे ग्रामस्थांच्या भूमिकेचे शिवसेना आ. निलेश राणे यांच्याकडून कौतुक

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 93 Views
असलदे ग्रामस्थांच्या भूमिकेचे शिवसेना आ. निलेश राणे यांच्याकडून कौतुक
अवैध दारू विक्रेत्याच्या माफीनाम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर केला शेअर ; जागरूक ग्रामस्थ प्रत्येक गावात निर्माण झाले पाहिजेत
असलदे गावात दारूबंदी असताना अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे कुडाळ-मालवणचे शिवसेना आ. निलेश राणे यांनी कौतुक केले आहे. ग्रामस्थांनी संबंधित दारू विक्रेत्याला जाब विचारत समज दिल्यानंतर त्या दारु विक्रेत्याने पुन्हा अवैध धंदा न करण्याची कबुली दिली. त्याबाबतचा व्हिडीओ आ. निलेश राणे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असलदे ग्रामस्थांच्या जागरूकतेचे अभिनंदन केले.

आमदार राणे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, "कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामस्थांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गावात दारूबंदी असताना दारू विक्रेत्याला जाब विचारत त्याला ताब्यात घेतले आणि समज दिली. असे जागरूक ग्रामस्थ प्रत्येक गावात असले पाहिजेत. असलदे गावातील ग्रामस्थांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन. तुम्ही सिंधुदुर्गाला एक नवीन सुरुवात करून दिली."

असलदे गावात अवैध दारू विक्रीच्या प्रकरणानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत संबंधितांना जाब विचारला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्याची दखल आमदार निलेश राणे यांनी घेत ग्रामस्थांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.दरम्यान, आमदारांच्या या प्रतिक्रियेनंतर असलदे ग्रामस्थांच्या दारूबंदी मोहिमेला अधिक बळ मिळाले आहे. गावातील सामाजिक वातावरण बिघडविणाऱ्या अवैध दारू व्यवसायाविरोधात नागरिकांनी पुढाकार घेणे ही सकारात्मक बाब असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |