संबंधित लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित छायांकित प्रती संबंधित तहसील कार्यालय / तलाठी कार्यालयाकडे दोन दिवसांच्या आत जमा कराव्यात,
• आधार कार्ड,
• पॅन कार्ड,
• बँक पासबुक,
• पी.पी.ओ. आदेश असल्यास त्याची प्रत
सोलापूर दि. 9 - मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.-४४/स्वासैक-१, दिनांक २६ में २०२६ अन्वये राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन योजना डीबीटी (DBT) पोर्टलवर समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतनधारक स्वातंत्र्य सैनिक तसेच स्वातंत्र्य सैनिक हयात नसल्यास सन्मान निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या वारसपत्नी यांची अद्ययावत माहिती शासनास सादर करावयाची आहे.तरी संबंधित लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित छायांकित प्रती संबंधित तहसील कार्यालय / तलाठी कार्यालयाकडे दोन दिवसांच्या आत जमा कराव्यात,
• आधार कार्ड,
• पॅन कार्ड,
• बँक पासबुक,
• पी.पी.ओ. आदेश असल्यास त्याची प्रत.
सदर माहिती तलाठी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे संकलित करण्यात येत आहे. ज्या स्वातंत्रसैनिक पेन्शनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसहची माहिती अद्याप दिली नाही, त्यांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा तलाठी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. विहित मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अद्ययावत करता येणार नाही व निवृत्तीवेतन जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर (स्वातंत्र्य सैनिक शाखा) दूरध्वनी क्र. ०२१७-२७३१०२० येथे संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.