पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

👤 बळीराज भराडे परभणी | 📅 09 June 2026 | 👁 222 Views
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केलेल्या वृक्षारोपणाच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षाच्या जिंतूर शहर मंडळाच्या वतीने क्रीडा संकुल परिसरात १०१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. वृक्षारोपणानंतर लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचा निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला.यावेळी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, गटनेते सचिन गोरे, उपाध्यक्ष मोहसीन खान, नगरसेवक किशोर जाधव व असेफ खान, मंडळाध्यक्ष विलास भंडारे, उपक्रमाचे संयोजक समीर जानीमियाँ, किसान मोर्चा मंडळाध्यक्ष सचिन रायपत्रीवार, बंटी जाधव, विजय जाधव, राजेश राठोड, शाहरुख सर, ताठे, सय्यद नसीर, रमेश संगेकर, अनिल मेटागळे, जोशी सर तसेच विद्यार्थी व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिंतूर येथील क्रीडा संकुल परिसरात भाजप शहर मंडळाच्या वतीने आयोजित वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |