उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…!

👤 संकेत तुकाराम सानप (मंत्रालय मिडिया प्रति व संपादक मुंबई) | 📅 09 June 2026 | 👁 206 Views
उबाठा  खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले,  उत्तम मंत्री…!
खासदार संजय राऊत यांनी पारंपरिक विरोधक असलेले मंत्री नितेश राणे यांची पहिल्यांदाच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. राऊत यांनी राणेंना राज्यातील 'उत्तम मंत्री' संबोधत मत्स्य विभागातील त्यांच्या कामाचे कौतुक केले. विधान परिषदेतील घोडेबाजारावरून भाजपला घेरल्यानंतर राणेंनी पाठवलेल्या 'बरनॉल'ला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी हे अनपेक्षित वक्तव्य केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे हे नेहमीच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका करत असतात. त्यांच्यावर नेहमी आगपाखड करत असतात. पण संजय राऊत नितेश राणे यांच्या टीकेवर कधीच कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीतील घोडेबाजारावरून राऊत यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यामुळे नितेश राणे यांनी राऊत यांना बरनॉल पार्सल पाठवून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं, तेव्हा राऊत यांनी नितेश यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली. राज्यातील उत्तम काम करणाऱ्या मंत्र्यांपैकी नितेश हे एक असल्याचं राऊत म्हणाले. राऊत यांनी पहिल्यांदाच नितेश राणे यांची तोंडभरून स्तुती केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

खासदार संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना नितेश राणे यांच्या गिफ्टवरून डिवचण्यात आलं. त्यावर राऊत यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं. मी काही त्यांना रिटर्न गिफ्ट पाठवणार नाही. त्यांनी दिलेल्या गिफ्टचा मी स्वीकार करेन. अनेक रुग्ण आहेत. त्यांना त्यांनी दिलेलं गिफ्ट पाठवेन. पण त्यांनी बरनॉल का ठेवलं? ते काय जखमी झाले होते का? त्यांना बरनॉल ठेवण्याची गरज का पडली?, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
तुम्ही तरुण मंत्री आहात. तुमचं कुटुंब मूळचं बाळासाहेबांच्या नेतृत्वातील आहे. एक लक्षात ठेवा, सत्ता अमर नसते. सत्ता येते जाते.
खात्याकडे लक्ष द्या. राज्यात जे मंत्री उत्तम काम करतात त्यापैकी नितेश राणे हे एक आहेत. मत्स्य विभाग खातं त्यांच्याकडे आहे. महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. उत्तमरित्या ते हे खातं सांभाळत आहेत. त्यांनी चांगल्या योजना आणल्या आहेत. हे मी सांगू शकतो, असं संजय राऊत म्हणाले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |