कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही!

👤 आकाश दडस सातारा | 📅 09 June 2026 | 👁 162 Views
कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही!
कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! माण तालुक्यातील ज्येष्ठ सनई वादक बबन गोळे यांना न्याय कधी? ग्रामविकास मंत्र्यांच्या शिफारशीनंतरही संबंधित विभाग सुस्त!
आपल्या कलेच्या माध्यमातून तब्बल ४० वर्षे लोकसंस्कृती जपणारे आणि समाजातील विविध मंगल प्रसंगांना सुरांची साथ देणारे माण तालुक्यातील मार्डी गावचे सुपुत्र तथा ज्येष्ठ सनई वादक श्री. बबन गोळे आज वृद्धापकाळात हक्काच्या शासकीय मानधनासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. आयुष्यभर लोककलेची प्रामाणिक सेवा करणाऱ्या या वृद्ध कलाकारावर आज उपेक्षेची वेळ आली असून, "त्यांना न्याय कधी मिळणार?" असा संतप्त सवाल माण तालुक्यातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्री. बबन गोळे यांनी 'सरकारी कलाकार मानधन योजने'साठी सुमारे सहा महिन्यांपूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. कागदपत्रांची पडताळणी आणि सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप त्यांना मानधन मंजूर झालेले नाही. आयुष्यभर लोककलेचे जतन करणाऱ्या कलाकाराला ६ महिने शासकीय मंजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने सांस्कृतिक क्षेत्रातून तीव्र खंत व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी स्वतः शिफारसपत्र देऊन संबंधित विभागाला सकारात्मक आणि तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, इतका मोठा कालावधी उलटूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. जर मंत्री दर्जाच्या लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनंतरही एका ज्येष्ठ कलाकाराला मानधनासाठी ताटकळत राहावे लागत असेल, तर सामान्य कलाकारांची अवस्था काय असेल? असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. संबंधित विभागातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणातील तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर कराव्यात आणि श्री. बबन गोळे यांचे हक्काचे कलाकार मानधन लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही या प्रकरणात पुन्हा एकदा लक्ष घालून ढिम्म प्रशासनाला तातडीने सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा मार्डी ग्रामस्थ आणि माण तालुक्यातील कलाप्रेमींनी व्यक्त केली आहे.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |