आदर्श सांसद ग्राम एनकुळच्या सुपुत्राचा राज्यस्तरीय गौरव

👤 संकेत तुकाराम सानप मुंबई. | 📅 08 June 2026 | 👁 380 Views
आदर्श सांसद ग्राम एनकुळच्या सुपुत्राचा राज्यस्तरीय गौरव
अरुण भगवान खरमाटे यांना आधार फाउंडेशनचा "राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२६" जाहीर
राहुरी येथील आधार फाउंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा "राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२६" आदर्श सांसद ग्राम एनकुळ येथील सुपुत्र श्री अरुण भगवान खरमाटे यांना जाहीर करण्यात आला आहे. समाजहित, जनसेवा, सामाजिक बांधिलकी आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
श्री अरुण भगवान खरमाटे यांनी आपल्या कार्यातून समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने योगदान देत सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असून समाजाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि सेवाभाव याचा गौरव म्हणून आधार फाउंडेशनने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या पुरस्काराच्या घोषणेनंतर एनकुळ ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संस्थांकडून श्री खरमाटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून गावाच्या नावलौकिकात भर पडली आहे.
आधार फाउंडेशनच्या वतीने लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री अरुण भगवान खरमाटे यांचे "राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२६" जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |