समाजसेवा, अध्यात्म आणि मानवतेच्या सेवेला मानाचा मुजरा! श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी पूजा माई नदगिरी महाराज (आतंरराष्ट्रीय किन्नर आखाडा नाशिक)आईसाहेब यांना "आधार फाउंडेशन राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२६" जाहीर*

👤 संकेत तुकाराम सानप मुंबई. | 📅 08 June 2026 | 👁 179 Views
समाजसेवा, अध्यात्म आणि मानवतेच्या सेवेला मानाचा मुजरा!  श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी पूजा माई नदगिरी महाराज (आतंरराष्ट्रीय किन्नर आखाडा नाशिक)आईसाहेब यांना "आधार फाउंडेशन राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२६" जाहीर*
श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी पूजा माई नदगिरी महाराज (आतंरराष्ट्रीय किन्नर आखाडा नाशिक)आईसाहेब यांना "आधार फाउंडेशन राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२६" जाहीर
अध्यात्म, समाजसेवा आणि मानवतेच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी पूजा माई नदगिरी आईसाहेब (आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा, नाशिक) तथा रेणुका माता यल्लमा आश्रम, वाढोली (त्र्यंबकेश्वर) यांच्या संस्थापक यांना प्रतिष्ठेचा "आधार फाउंडेशन राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२६" जाहीर झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी पूजा माई नदगिरी आईसाहेब या अनाथ, निराधार, गरजू, वंचित आणि समाजातील दुर्बल घटकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रेणुका माता यल्लमा आश्रमामार्फत अनाथ बालकांचे संगोपन, शिक्षण, निवारा, अन्नदान, आरोग्यसेवा तसेच धार्मिक व आध्यात्मिक प्रबोधनाचे कार्य अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे.
समाजातील उपेक्षित आणि गरजू व्यक्तींना आधार देत मानवतेचा संदेश देणारे कार्य त्यांनी उभे केले आहे. सेवा, समर्पण आणि करुणा या मूल्यांवर आधारित त्यांच्या कार्यामुळे हजारो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. आश्रमाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना मदतीचा हात देत त्यांनी समाजासमोर सेवाभावाचा आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत आधार फाउंडेशन यांनी त्यांची "समाजभूषण पुरस्कार २०२६" साठी निवड केली आहे. पुरस्कार घोषणेनंतर सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हा सन्मान केवळ स्वामी पूजा माई नदगिरी आईसाहेब यांचाच नसून रेणुका माता यल्लमा आश्रमाशी जोडलेल्या सर्व सेवाभावी कार्यकर्ते, भक्तगण आणि समाजहितासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्वामी पूजा माई नदगिरी आईसाहेब यांना "आधार फाउंडेशन राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२६" जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील समाजसेवा, अध्यात्म आणि मानवकल्याणाच्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |