बहुजन समाज कलावंत परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत, विनोद मूर्ती गोरख पाचेगावकर यांची निवड

👤 अतुल फसाले | 📅 07 June 2026 | 👁 194 Views
बहुजन समाज कलावंत परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत, विनोद मूर्ती  गोरख पाचेगावकर यांची  निवड
सांगोला: बहुजन समाज कलावंत परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदाची धुरा महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत आणि विनोद मूर्ती श्री. गोरख पाचेगावकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच ही घोषणा करण्यात आली.
गोरख पाचेगावकर हे नाव महाराष्ट्राच्या लोकधारेत आणि तमाशा क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जाते. महाराष्ट्रातील एक 'अजोड सोंगाड्या' म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख आहे. आपल्या अचूक टायमिंगने, दर्जेदार विनोदाने आणि कसदार अभिनयाने त्यांनी गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
त्यांच्या लोकप्रियतेची पाळेमुळे ग्रामीण भागात किती घट्ट रुजली आहेत, याचे उदाहरण म्हणजे अनेक गावांमध्ये यात्रेचे कार्यक्रम ठरवताना गावकरी आणि कमिटीचे लोक तमाशा मालकाला
पाचेगावकर तमाशात असणे म्हणजेच कार्यक्रमाच्या यशाची शंभर टक्के खात्री, असे समीकरण आज ग्रामीण महाराष्ट्रात बनले आहे.
कलावंतांच्या हक्कासाठी नवे व्यासपीठ
गोरख पाचेगावकर यांच्या या अफाट लोकसंग्रहाचा आणि अनुभवाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील तमाशा, लोककला आणि इतर क्षेत्रांतील बहुजन कलावंतांना संघटित करण्यासाठी होणार आहे. आपल्या निवडीबद्दल बोलताना पाचेगावकर यांनी पक्ष आणि संघटनेच्या सर्व वरिष्ठांचे आभार मानले असून, कलावंतांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास व्यक्त केला.
या गुणी आणि लोकमान्य कलावंताची पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल कलाक्षेत्रातून, राजकीय व सामाजिक स्तरातून आणि त्यांच्या असंख्य चहात्यांकडून त्यांच्यावर हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे!
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |