मोगराळे व शिंगणापूर फिडरवरील लोडशेडिंग बंद करा; राष्ट्रीय समाज पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

👤 आकाश दडस सातारा | 📅 05 June 2026 | 👁 172 Views
मोगराळे व शिंगणापूर फिडरवरील लोडशेडिंग बंद करा; राष्ट्रीय समाज पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
"महावितरणने जनतेच्या या रास्त आणि न्याय्य मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हे लोडशेडिंग त्वरित थांबवावे. जर यावर प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आम्हाला जनतेच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल. श्री. शरद दडस (सरसरचिटणीस, राष्ट्रीय समाज पक्ष,)
माण तालुक्यातील मोगराळे आणि शिंगणापूर फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अघोषित लोडशेडिंगमुळे ग्रामीण जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दररोज संध्याकाळी ६:०० ते रात्री १०:०० या अत्यंत महत्त्वाच्या वेळेत होणारी ही वीज कपात त्वरित बंद करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरसरचिटणीस श्री. शरद दडस यांनी थेट मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन पाठवून तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. सकारात्मक निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात ग्रामीण भागातील नागरिकांच्या अत्यंत गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय चालतो. संध्याकाळच्या वेळी गाई-म्हशींची धार काढण्यासाठी सध्या आधुनिक मिल्किंग मशीनचा वापर केला जातो. मात्र, नेमक्या याच वेळेत वीज गायब राहत असल्याने ज्यांच्याकडे जास्त जनावरे आहेत, त्यांना हाताने धार काढणे अशक्य बनले आहे. परिणामी, दूध वेळेवर संकलन केंद्रात पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे, हाच काळ शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा मुख्य वेळ आहे. रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे अंधारात अभ्यास कसा करावा? असा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. सध्या उन्हाळा संपून पावसाळ्याचे दिवस सुरू होत असल्याने ग्रामीण भागात साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लागोपाठ चार तास वीज गायब राहत असल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडून जाते, ज्यामुळे लहान मुले आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच महिलांनाही अंधारात घरगुती कामे व स्वयंपाक करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रासपच्या प्रमुख मागण्या मोगराळे व शिंगणापूर फिडरवरील संध्याकाळी ६:०० ते रात्री १०:०० या वेळेतील अघोषित लोडशेडिंग त्वरित व पूर्णपणे बंद करण्यात यावे.जर काही तांत्रिक कारणांमुळे वीज कपात करणे अपरिहार्य असेल, तर ती रात्रीच्या वेळी न करता दुपारी किंवा इतर सवडीच्या वेळेत विभागून करावी. या दोन्ही फिडरवर कोणत्याही व्यत्ययाशिवाय अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा बहाल करण्यात यावा.



Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |