वझर बु.चा जिल्ह्यात डंका; युवा सरपंच अर्जुन मते यांचा राज्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

👤 बळीराज भराडे परभणी | 📅 04 June 2026 | 👁 446 Views
वझर बु.चा जिल्ह्यात डंका; युवा सरपंच अर्जुन मते यांचा राज्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
जिंतूर: वझर बु. (तालुका जिंतूर) ग्रामपंचायतीने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून, या ऐतिहासिक यशाबद्दल ग्रामपंचायतीचे तरुण आणि तडफदार युवा सरपंच अर्जुन गोविंदराव मते यांचा 'लोकमत' समूहाच्या वतीने राज्याच्या राज्यमंत्री मेघनादीदी बोर्डीकर यांच्या हस्ते गौरव चिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. अत्यंत दिमाखदार सोहळ्यात पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील अनेक राजकीय, सामाजिक व शासकीय मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. वझर बु. सारख्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीला आपल्या कल्पक आणि प्रभावी कार्यपद्धतीने थेट जिल्हास्तरावर अव्वल स्थानी झळकवल्याबद्दल, तसेच गावाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल युवा सरपंच अर्जुन मते यांच्यावर सध्या संपूर्ण जिल्ह्यातून, राजकीय वर्तुळातून आणि सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |