विद्याताई मोटे यांच्या कथित बदनामीप्रकरणी २७ फेसबुक आयडीधारकांविरुद्ध गुन्हा दाखल

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 03 June 2026 | 👁 340 Views
विद्याताई मोटे यांच्या कथित बदनामीप्रकरणी २७ फेसबुक आयडीधारकांविरुद्ध  गुन्हा दाखल
आक्षेपार्ह पोस्ट व छायाचित्रे प्रसारित केल्याचा आरोप; आटपाडी पोलिसांकडे तक्रार
सोशल मीडियावरून कथित बदनामी केल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात तब्बल २७ फेसबुक आयडीधारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची (एनसीआर) नोंद करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विभुतवाडी (ता. आटपाडी) येथील हेमंत तुकाराम मोटे (वय २५, व्यवसाय – शेती) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, दि. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास फेसबुकवरील विविध आयडीवरून सचिन मोटे व विद्याताई मोटे यांच्याबाबत आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक स्वरूपाच्या पोस्ट तसेच छायाचित्रे प्रसारित करण्यात आली.
तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या फेसबुक आयडींमध्ये विषय सांगली, विकास अनिल कांबळे, आबासाहेब भानवसे, युवराज कोकरे, कट्टर पडळकर समर्थक, दीपक शिंदे पाटील, विशाल साळुंखे, अनिल गुप्ता, दीपक मसाळ, अजित भानुसे, अमरनाथ मांगसुळे, भाऊसाहेब थोरात, रावसाहेब काळे, आकाश हजारे, राहुल जाधव, संतोष भिसे, समाधान पिंजारी, गोपीचंद पडळकर साहेब प्रेमी, ओंकार पुकळे, समाजसुधारक, शेठ गोपी, महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, डॅनी एम, बाजीराव सिंघम, बाळासाहेब दाईगडे, एम. सुहास आणि D.R.X दिलीप पडळकर या आयडींचा समावेश आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित आयडीधारकांनी जाणूनबुजून फेसबुकच्या माध्यमातून सचिन मोटे व विद्याताई मोटे यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर व छायाचित्रे प्रसारित केली. त्यामुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा व वैयक्तिक प्रतिमा मलिन होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून फिर्यादीस न्यायालयात दाद मागण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक विनय रामचंद्र बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आवश्यक प्रतिबंधक व कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोशल मीडियावरील पोस्ट आणि अभिव्यक्तीच्या मर्यादांबाबत हे प्रकरण तालुक्यात चर्चेचा विषय ठरले असून पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |