राजेंद्र खरात यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा संपन्न

👤 राहुल टिबे सांगली | 📅 02 June 2026 | 👁 254 Views
राजेंद्र खरात यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा संपन्न
आटपाडी : सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र खरात यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचाचे सचिव सुरेश मोटे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या उद्देशाचे महत्त्व विशद केले. यावेळी स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुण वाघमारे, नगराध्यक्ष उत्तम जाधव, जिल्हा परिषद बांधकाम सभापती पृथ्वीराज पाटील, पंचायत समिती सभापती दत्तात्रय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष अनिल पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, डॉ. विनय पत्की आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सन्मान करून शैक्षणिक क्षेत्राला प्रोत्साहन देणारे कार्य सातत्याने केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मा. राजेंद्र खरात यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी आईचे दुःखद निधन झाले असतानाही विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाची परंपरा खंडित होऊ न देता समाजहिताचे कार्य सुरू ठेवणे हे प्रेरणादायी असून इतरांनीही आदर्श घेण्यासारखे आहे. याबद्दल त्यांनी खरात यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल पालकांनी संयोजकांचे विशेष कौतुक केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष धनंजय वाघमारे, शरद वाघमारे, विवेक सावंत, विलास धांडोरे, मारुती ढोबळे, सुरेश मोटे, नारायण जावीर, जनार्दन मोटे, विजय पवार, प्रा. उत्तम मोटे, दत्तात्रय चव्हाण, संतोष लांडगे, राजेश मोटे, सागर भोसले, मुकेश सवणे, रघुनाथ कांबळे, भीमराव कदम, जगन्नाथ हाडमोडे, प्रतिभा सावंत, शोभा धांडोरे,विटा चंद्रकांत कांबळे,बशीर भाई मुजावर, शरद घाडगे,आशद मुजावर, अँड.शहानवाज मुसा काजी,यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनार्दन मोटे यांनी प्रभावीपणे केले. शेवटी उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |