शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे आणि आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांचा आयर कुटुंबाला मदतीचा हात

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 01 June 2026 | 👁 225 Views
शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे आणि आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांचा आयर कुटुंबाला मदतीचा हात
शनिवार ९मे रोजी सोसाट्याच्या वा-यासह आचरा येथे पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने घराचे नुकसान झालेल्या श्रीमती मनीषा मनोहर आयर कुटुंबाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे आणि आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी भेट देत श्रीमती मनीषा आयर यांच्या कडे रोख आर्थिक मदत सुपूर्द केली.९मे रोजी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने आयर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.संसार उघड्यावर आलेल्या आयर कुटुंबाची विदारक परिस्थिती समजल्यावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांनी त्यावेळी तातडीने छप्परावर घालण्यासाठी ताडपत्रीही उपलब्ध करून दिली होती.त्यांच्या या सहकार्याबद्दल आयर कुटुंबाकडून धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |