सुशांत नाईक, संकेत नाईक यांना मिळालेले नगरसेवक पद राणेंच्या आशीर्वादामुळे;नैतिकता असेल तर राजीनामा द्या

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 01 June 2026 | 👁 174 Views
सुशांत नाईक, संकेत नाईक यांना मिळालेले नगरसेवक पद राणेंच्या आशीर्वादामुळे;नैतिकता असेल तर राजीनामा द्या
आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यानंतर कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक आणि त्यांचे बंधू नगरसेवक संकेत नाईक यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा.नाहीतर यापुढे राणे कुटुंबियांवर टीका करण्याची हिम्मत करू नये. असा स्पष्टच इशारा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे. ते माध्यमांसोबत बोलतं होते. कणकवली नगरपंचायतीमध्ये सुशांत नाईक आणि संकेत नाईक यांना मिळालेले नगरसेवक पद हे राणे कुटुंबीयांच्या आशीर्वादामुळे मिळालेले आहे. हे आता तर ते सिद्ध झालेले आहे. असे असताना ज्यांच्या कृपाशीर्वादाने निवडून आले त्याच राणे कुटुंबियांवर टीका करणे नैतिकतेला धरून नाही. नाईक कुटुंबियांमध्ये थोडी तरी नैतिकता असेल तर ते स्वतःच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देतील. असा टोला समीर नलावडे यांनी लगावला आहे. राणेंच नेतृत्व मान्य केलात म्हणून तुम्ही खुर्चीत बसलात.नाहीतर नाईकांच्या घरातील उपनगराध्यक्ष 2008 पूर्वी होते. आता झालाच नसता.हिम्मत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा असे आव्हान त्यांनी दिले.निवडणुकीला तुम्हाला राणेंचे पैसे लागतात.त्यांच्या जीवावर निवडून येता मग द्या राजीनामे. बघूया परत कोण निवडून येत. असे आव्हान समीर नलावडे यांनी वैभव नाईक यांना दिले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |