राजेंद्र पेडणेकर यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट; व्यापारी संकुलाबाबत सविस्तर चर्चा

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 01 June 2026 | 👁 149 Views
राजेंद्र पेडणेकर यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट; व्यापारी संकुलाबाबत सविस्तर चर्चा
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आज ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली येथील नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (भाजी मार्केट) यांच्या मागणीनुसार नगरपंचायत मालकीच्या जागेवर नवीन व्यापारी संकुल उभारणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी आधुनिक व सुसज्ज व्यापारी संकुल उभारण्याची आवश्यकता यावेळी मांडण्यात आली. यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नवीन व्यापारी संकुल उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच या प्रकल्पाला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली.भेटीच्या शेवटी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध सामाजिक व स्थानिक विकास विषयांवरही चर्चा झाली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |