समनापुर-निमोण गटात जिल्हा परिषदेसाठी कविता कैलास पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा

👤 संकेत तुकाराम सानप (मुंबई मंत्रालय) | 📅 30 May 2026 | 👁 313 Views
समनापुर-निमोण गटात जिल्हा परिषदेसाठी कविता कैलास पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा
संगमनेर प्रतिनिधी : आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील समनापुर-निमोण गटात राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत येत आहेत. यामध्ये कविता कैलास पाटील यांच्या नावाची विशेष चर्चा सुरू असून, स्थानिक पातळीवर त्यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे कविता पाटील यांनी गटातील नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध गावांमध्ये सातत्याने संपर्क ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
समनापुर-निमोण गटात महिला नेतृत्वाला वाढती पसंती मिळत असून, कविता पाटील यांचे नाव याच पार्श्वभूमीवर अधिक चर्चेत आले आहे. ग्रामीण भागातील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडल्याने अनेक कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
स्थानिक नागरिक, महिला वर्ग आणि युवा कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यास निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अधिकृत उमेदवारीबाबत कोणतीही घोषणा झालेली नसली तरी समनापुर-निमोण गटात कविता कैलास पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, आगामी काळात राजकीय समीकरणे कोणते वळण घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मणेराजुरी येथे तलावात बुडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; चिमुरडीला वाचवताना आईनेही गमावला जीव | लातूरमध्ये 'ती' बैलाच्या जागी स्वतः जुंपली नांगराला! काळजाचा थरकाप उडवणारी विदारक वास्तवता | संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! |