आटपाडीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मुंबई आयकर उपायुक्त सचिन मोटे यांच्या हस्ते गौरव

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 29 May 2026 | 👁 272 Views
आटपाडीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मुंबई आयकर उपायुक्त सचिन मोटे यांच्या हस्ते गौरव

आटपाडी तालुक्यातील एस.एस.सी परीक्षा 2026 मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मुंबई येथील आयकर उपायुक्त सचिन मोटे यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला. या प्रेरणादायी कार्यक्रमास साध्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई मोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मार्गदर्शन करताना सचिन मोटे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील करिअरचे योग्य नियोजन कसे करावे, शिक्षणाला जीवनात किती महत्त्व द्यावे आणि शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्वासोबत समाजात मोठे परिवर्तन कसे घडू शकते याबाबत प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले.
विद्याताई मोटे यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी साध्य फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा व मदतीचा आढावा त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |