कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडू दिलासा मिळणार !

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 29 May 2026 | 👁 174 Views
कोकणातील आंबा  उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडू दिलासा मिळणार !
मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे नुकसानीच्या मदतीची मागणी आंबा विम्यातील जाचक अटी हटविण्याची मागणी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विमा कंपन्यांची बैठक घेण्याची ग्वाही
नवी दिल्ली : कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली.
यावेळी आंबा शेतीच्या विमा योजनांमध्ये विमा कंपन्यांनी घातलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. या अटींमध्ये आवश्यक बदल केल्यास आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळू शकतो, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
या मागणीची दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विमा कंपन्यांची बैठक घेऊन यावर योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दिल्ली येथे झालेल्या बैठकीत कोकणातील आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, तसेच शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा केंद्र सरकार कडून मिळावा, अशी भूमिका राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मांडली. यावेळी कोकणातील आंबा उत्पादनावर झालेल्या परिणामाची सविस्तर माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांना देण्यात आली.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्रीगिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |