स्वच्छ तासगाव, सुंदर तासगाव' अभियानांतर्गत कापूर ओढ्याच्या स्वच्छतेसाठी तासगाव नगरपरिषदेचा पुढाकार! ​

👤 संतोष एडके तासगाव | 📅 29 May 2026 | 👁 276 Views
स्वच्छ तासगाव, सुंदर तासगाव' अभियानांतर्गत कापूर ओढ्याच्या स्वच्छतेसाठी तासगाव नगरपरिषदेचा पुढाकार! ​
तासगाव: 'स्वच्छ तासगाव, सुंदर तासगाव' हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तासगाव नगरपरिषदेने पुढाकार घेत एक विशेष स्वच्छता मोहीम राबवली. गुरुवारी सकाळी शहरातील कापूर ओढा परिसरात राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेला लोकनियुक्त नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक-नगरसेविका व गटनेते यांच्यासह नागरिक, विविध संस्था आणि लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
​पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्याचा विचार करून ही मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत नगरपरिषदेसोबतच अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ (शाखा तासगाव) यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ओढ्यातील कचरा आणि साचलेली घाण साफ केली, ज्यामुळे परिसराचे स्वरूप उजळले.
​या मोहिमेचे नेतृत्व करताना नगराध्यक्षा सौ. विजया बाबासो पाटील यांनी नागरिकांना स्वच्छतेचा संकल्प करण्याचे आवाहन केले. "केवळ आजची स्वच्छता मोहीम नाही, तर ओढा व परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे," असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ. विजया पाटील यांनी यावेळी केले.
​या उपक्रमात उपनगराध्यक्ष प्रसाद भारत पैलवान, आरोग्य सभापती सौ. संध्या संजय लुगडे, मुख्याधिकारी सुधाकर सुकदेव लेंडवे, गटनेते नगरसेवक सतीश किसन लिंबळे यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
​नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या पर्यावरणपूरक मोहिमा लोकसहभागातून राबवण्याचा मानस नगरपरिषदेने व्यक्त केला आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला दिलेली ही साथ अत्यंत मोलाची ठरली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |