चाकरमानी परतीच्या प्रवासाला...

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 28 May 2026 | 👁 7 Views
चाकरमानी परतीच्या प्रवासाला...
गजबजलेली गावे पुन्हा ओस; रेल्वे, एसटी आणि खासगी बसस्थानकांवर गर्दी
मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त आपल्या मूळ गावी आलेले चाकरमानी आता पुन्हा मुंबई, पुणे तसेच इतर शहरांच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागले आहेत. रेल्वे, एसटी बस तसेच खासगी आराम बसमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी रवाना होत असल्याने स्थानकांवर गर्दीचे चित्र दिसून येत आहे. गेले दीड महिना चाकरमान्यांच्या उपस्थितीने गजबजून गेलेली वैभववाडी तालुक्यातील गावे आता पुन्हा शांत आणि ओस पडू लागली आहेत.

वैभववाडी तालुक्यातील अनेक कुटुंबे रोजगार, नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, ठाणे तसेच इतर महानगरांमध्ये स्थायिक झाली आहेत. त्यामुळे गावातील अनेक घरे वर्षातील बहुतांश काळ बंद अवस्थेत असतात. गणेशोत्सव, शिमगोत्सव आणि मे महिन्याच्या सुट्टया हेच काळ गावांना पुन्हा एकदा जीवंतपणा देणारे ठरतात. काही घरांमध्ये फक्त वृद्ध आई-वडील राहत असल्याने चाकरमान्यांच्या आगमनाची ते वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात.

मे महिन्यात सुट्टी मिळताच चाकरमानी आपल्या कुटुंबीयांसह

कणकवली : मुंबईला परतण्यासाठी खाजगी गाड्यांच्या वाहनतळावर झालेली प्रवाशांची गर्दी.

चाकरमान्यांनी लुटला रानमेव्याचा आनंद

लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींनीही रानमेवा गावठी आंबे, करवंदे, जांभूळ यासारख्या रान मेव्याचा आस्वाद घेतला. त्याचप्रमाणे तालुक्यातील अरुणा प्रकल्पामुळे अरुणा नदी, तरी कुर्सी धरणामुळे शिवगंगा नदी वाहत असून या नदीत पोहण्याचा आनंदही लहान थोरांनी लुटल्याचे पाहायला मिळाले.

गावाकडे दाखल झाले होते. या काळात गावागावांत धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. सत्यनारायणाच्या महापूजा, लासमारंभ, जयंती उत्सव, क्रिकेट


स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ग्रामदैवतांच्या यात्रांमुळे ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. लहान मुलांनीही गावातील निसर्गरम्य वातावरण, आंबा-काजू बागा, नदी-ओढे आणि पारंपरिक

खेळांचा आनंद घेतला,

चाकरमान्यांच्या आगमनामुळे ग्रामीण बाजारपेठांनाही चांगलीच चालना मिळाली होती. किराणा दुकाने, हॉटेल्स, फळ विक्रेते, कोकणी मेवा, कपड्यांची दुकाने तसेच वाहन व्यवसायिकांकडे ग्राहकांची वर्दळ वाढली होती. अनेकांनी घरांची दुरुस्ती, रंगकाम तसेच शेतीसंबंधित कामेही या काळात उरकून घेतली.

मात्र आता सुट्ट्या संपल्याने चाकरमानी पुन्हा शहरांकडे रवाना होत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर तसेच बसस्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. आरक्षण मिळत नसल्याने अनेक जण खासगी आराम बसांचा पर्याय निवडत आहेत. गाव सोडताना अनेकांच्या डोळ्यांत भावनिक क्षणही पाहायला मिळत आहेत. वृद्ध पालकांचा निरोप घेताना वातावरण हळवे होत असून "पुन्हा गणपतीला भेटू" असे आश्वासन देत चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.

मे महिनाभर गजबजलेल्या गावांमध्ये आता पुन्हा शांतता पसरू लागली असून चाकरमान्यांच्या पुढील आगमनाची प्रतीक्षा ग्रामस्थांना लागून राहिली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |