बर्वे लायब्ररीत साहित्यिक गोविंद गोडबोले यांचे कथाकथन

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 28 May 2026 | 👁 155 Views
बर्वे लायब्ररीत साहित्यिक गोविंद गोडबोले यांचे कथाकथन
‘मुक्तसंवाद’ कार्यक्रम मालिकेतील तिसरे पुष्प ; ३० मे रोजी आयोजन
गोविंद गोडबोले यांच्या कथाकथनाचा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता देवगड येथील बर्वे लायब्ररी नजीकच्या स्नेहसंवर्धक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड आणि देवगड पेन्शनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‘मुक्तसंवाद’ या शीर्षकाखाली वर्षभरात दर महिन्याला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना निमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्याचे एकूण बारा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, साहित्यिक गोविंद गोडबोले यांचे कथाकथन हे या कार्यक्रम मालिकेतील तिसरे पुष्प ठरणार आहे.
मिरज येथील रहिवासी असलेले गोविंद गोडबोले यांनी नागपूर, पुणे आणि रत्नागिरी येथील आकाशवाणी केंद्रांवर अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते सेवानिवृत्त असून विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. विशेषतः बालसाहित्य निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या साहित्यिक कार्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उमाबाई बर्वे लायब्ररीचे अध्यक्ष डॉ. गुरूदेव परूळेकर तसेच देवगड पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र हिंदळेकर यांनी केले आहे.
ही माहिती ग्रंथपाल प्रशांत शं. बांदकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |