अंबड-चौंडी बसच्या पहिल्या प्रवासातून भाविकाला लाभले अहिल्यामातेच्या दर्शनाचे भाग्य तहान-भूक विसरून केला प्रवास; भावनिक अनुभवाने भारावले वातावरण

👤 अनिल भालेकर जालना | 📅 26 May 2026 | 👁 295 Views
अंबड-चौंडी बसच्या पहिल्या प्रवासातून भाविकाला लाभले अहिल्यामातेच्या दर्शनाचे भाग्य तहान-भूक विसरून केला प्रवास; भावनिक अनुभवाने भारावले वातावरण
अंबड ते चौंडी या नव्याने सुरू झालेल्या एसटी बससेवेच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी एका भाविकाने अहिल्यामातेच्या दर्शनासाठी केलेला जिद्दीचा प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. सामाजिक कार्यकर्ते मल्हारश्री अनिल भालेकर यांनी तहान-भूक विसरून तब्बल नऊ ते दहा तासांचा प्रवास करत चौंडी येथे जाऊन अहिल्यामातेचे दर्शन घेतले.
अंबड-चौंडी बससेवेचे उद्घाटन झाल्यानंतर बस प्लॅटफॉर्मवर उभी असताना प्रवासी संख्या कमी असल्याने बस रवाना करण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. यावेळी बसच्या महिला कंडक्टर यांनी प्रवासी नसल्याचे आणि वेळ झाल्याचे कारण सांगत बस सोडण्याबाबत निरुत्साह व्यक्त केला. मात्र, लक्ष्मण बेवले सर, सुनील भाऊ भिडे, बाबुराव भाऊ खरात यांच्यासह उपस्थितांनी आगर प्रमुख आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
“चौंडीला जाणारा किमान एक प्रवासी असेल तर बस जाईल,” असा निर्णय झाल्यानंतर अनिल भालेकर स्वतः बसमध्ये जाऊन बसले आणि अखेर बस चौंडीकडे रवाना झाली.
कोणतीही पूर्वतयारी नसताना सुरू झालेल्या या प्रवासात मोबाईलची चार्जिंग संपली, जेवणाची सोय नव्हती आणि वाटेत बस कुठेही थांबली नाही. मात्र, अहिल्यामातेच्या दर्शनाची तीव्र ओढ आणि मनातील श्रद्धेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण प्रवास पूर्ण केला.
दरम्यान, पाटोदा बसस्थानक येथे बसचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. या उत्साही वातावरणामुळे प्रवासातील थकवा कमी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
चौंडी येथे पोहोचून अहिल्यामातेच्या चरणी नतमस्तक होताच सर्व थकवा दूर झाल्याची अनुभूती आल्याचे भालेकर यांनी सांगितले. “अहिल्यामातेने मलाच दर्शनासाठी बोलावले असावे,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या प्रवासानंतर नव्या ऊर्जेने प्रेरित झालेल्या अनिल भालेकर यांनी होळकरशाहीच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |