टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यालय विट्यात

👤 विटा प्रतिनिधी | 📅 25 May 2026 | 👁 224 Views
टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यालय विट्यात
सहाव्या टप्प्याच्या कामांना गती मिळणार : आ. सुहास बाबर
टेंभू उपसासिंचन योजनेचे कार्यालय सांगली येथून विटा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने घेतला असून, या निर्णयामुळे खानापूर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मागणी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी सातत्याने लावून धरली होती. त्यानंतर विद्यमान आमदार सुहास बाबर यांनीही शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत ही मागणी पूर्णत्वास नेली.

महामंडळाने जारी केलेल्या कार्यालयीन आदेशानुसार कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्र. १, सांगली हे कार्यालय आता विटा येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. विटा हे टेंभू योजनेचे मध्यवर्ती व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगांव, कडेगाव, माण खटाव व सांगोला तसेच परिसरातील अनेक भागांशी विट्याचा थेट संपर्क असल्याने या कार्यालयाच्या स्थलांतराचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. विशेषतः टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे काम सध्या वेगाने सुरू असून, संबंधित अभियंते व अधिकारी प्रकल्प क्षेत्राच्या अधिक जवळ राहणार असल्याने कामकाजात समन्वय वाढून गती मिळेल.

स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी टेंभू योजनेसाठी आयुष्यभर संघर्ष केला. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने शासन दरबारी आवाज उठवला होता. त्याच भूमिकेतून विटा येथे कार्यालय आणण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या पश्चात आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच जलसंपदा मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही मागणी मंजूर करून घेतली.
या निर्णयानंतर आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार असून, शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना कामासाठी सांगलीपर्यंत धाव घ्यावी लागणार नाही. तसेच टेंभू योजनेच्या कामांवर अधिक प्रभावी नियंत्रण राहील, स्थानिक पातळीवरील तक्रारी व प्रश्न तातडीने निकाली निघतील तसेच शेतकऱ्यांना प्रशासनाशी थेट संपर्क साधणे अधिक सोपे होईल, असा विश्वास आमदार बाबर यांनी व्यक्त केला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |