कणकवली बाजारपेठेतील लेडीज टेलर दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 25 May 2026 | 👁 184 Views
कणकवली बाजारपेठेतील लेडीज टेलर दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी
लाखोंचे नुकसान ; सुदैवाने नागरिकांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
कणकवली शहरातील बाजारपेठेत रविवारी मध्यरात्री १२ वा. च्या सुमारास नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या घराशेजारी असलेल्या महाडिक लेडीज टेलर या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच स्थानिक युवक आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले. दुकानातून निघणारे धुराचे लोट छतापर्यंत पसरत होते. बाजारपेठेतील गर्दीची जागा आणि आजूबाजूला इतर दुकाने असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र युवक, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनीही घटनास्थळी पोहोचून मदत कार्यात सहभाग घेतला. नगरपंचायतीचा अग्निशामक बंबही तातडीने दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात
आणण्यास मदत झाली.
दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या मे महिन्यातील हंगामामुळे दुकानात मोठ्या प्रमाणात ड्रेस, साड्या, दप्तर, छत्र्या, रेनकोट तसेच शिलाई साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. आगीत हे सर्व साहित्य जळून खाक झाले. याशिवाय फर्निचर, वायरिंग, इंटेरियर आणि अन्य साहित्याचेही मोठे नुकसान झाले असून दुकान मालक प्रसाद महाडिक यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |