देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही : पालकमंत्री नितेश राणे

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 24 May 2026 | 👁 357 Views
देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही : पालकमंत्री नितेश राणे
भाजपा सिंधुदुर्ग आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळेस भेट देऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा
मालवण | प्रतिनिधी :
भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला महासत्ता बनवायचे असेल, तर हिंदुत्वाचा विचार अधिक व्यापकपणे रुजविण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी चौके वाघवणे येथे बोलताना केले.

भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने मालवण तालुक्यातील चौके वाघवणे येथील नॅनी ग्रँड रिसॉर्ट येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत आयोजित प्रशिक्षण अभियान कार्यशाळेस भेट देऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, प्रमुख वक्ते अभिजित सामंत उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, आज कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर उभा आहे. भाजपा कार्यकर्ता हा अभिमान आहे. कार्यकर्ते यांना न्याय देणारा पक्ष म्हणजे भाजप. कार्यकर्ते यांना दिलेला शब्द पाळला जातो तो पक्ष भाजप. एकजुटीने काम करा, आपला पक्ष मजबूत करा. कार्यकर्ते यांनी पक्षासाठी वेळ द्यावा. असे आवाहन त्यांनी केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |