श्रम, जिद्द, सातत्य असेल तर यश नक्की - राजस रेगे

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 24 May 2026 | 👁 234 Views
श्रम, जिद्द, सातत्य असेल तर यश नक्की -  राजस रेगे
श्रम, जिद्द, सातत्य असेल तर यश नक्की मिळते, काहीतरी घडण्याची जिद्द असावी, विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी कार्य करावे यासाठी हा सत्कार समारंभ आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली आहे, असे मार्गदर्शन जेष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजस रेगे यांनी केले . ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवली, पेन्शनर्स असोसिएशन कणकवली आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पेन्शनर्स भवन कणकवली येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात भालचंद्र मराठे,माजी जिल्हाध्यक्ष, पेन्शनर्स असोसिएशन सिंधुदुर्ग, श्री मनोहर पालेकर , श्रद्धा कदम तालुकाध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र,शाखा कणकवली, हरीभाऊ भीसे सर, गोविंद साळकर , उपाध्यक्ष पेन्शनर्स असोसिएशन कणकवली, सुगंधा देवरुखकर, जिल्हा उपाध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र,सिंधुदुर्ग यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच गुणवंत विद्यार्थिनी कु . सान्वी कारेकर आणि प्रतीक्षा पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केले तर पालक प्रतिनिधी म्हणून श्री.कारेकर सर यांनी मनोगत व्यक्त करत सदरच्या सत्काराने आपण भारावून गेल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमात कणकवली तालुक्यातील इ.१२ वी मधील तसेच इ.१० वी मधील कणकवली तालुक्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,गुलाब पुष्प,पेन व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास राजस रेगे, मनोहर पालेकर ,अर्जुन राणे, भालचंद्र मराठे ,प्राध्यापक हरीभाऊ भिसे, विलास चव्हाण, कुबेर भोजे, प्रमोद लिमये, गोविंद साळकर, अनुप्रिया रेगे, प्रियांका दळवी, राजन भोसले,सुगंधा देवरुखकर, रिमा भोसले, श्रद्धा कदम,पूजा सावंत, सिद्धार्थ तांबे,विनायक पाताडे, सखाराम सपकाळ इत्यादी तीनही संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. तसेच गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रीमा भोसले जिल्हा महिला संघटक, ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग यांनी केले तर प्रास्ताविक सौ. पूजा सावंत, सचिव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र,शाखा कणकवली यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री प्रमोद लिमये, सचिव ज्येष्ठ नागरिक संघटना कणकवली यांनी केले .
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मणेराजुरी येथे तलावात बुडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; चिमुरडीला वाचवताना आईनेही गमावला जीव | लातूरमध्ये 'ती' बैलाच्या जागी स्वतः जुंपली नांगराला! काळजाचा थरकाप उडवणारी विदारक वास्तवता | संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! |