"पिलीव येथे नृसिंह जयंती उत्साहात साजरी"

👤 रघुनाथ देवकर माळशिरस | 📅 22 May 2026 | 👁 243 Views
"पिलीव येथे नृसिंह जयंती उत्साहात साजरी"
तालुक्यातील पिलीव या ठिकाणी सालाबाद प्रमाणे नृसिंह जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. श्रीराम गल्ली येथील नृसिंह मंदिरासमोर सुनील स्वामी यांचे हस्ते श्रीनिवास कुलकर्णी यांनी धार्मिक विधी व आरती करून भक्ती भावाने नृसिंह अनेक भक्तांनी पुष्पवृष्टी करून नृसिंह जयंती साजरी केली. त्याचप्रमाणे सुतार गल्ली या ठिकाणीही सर्व सुतार परिवार व भाविक भक्तांनी ह भ प चौगुले महाराज भाळवणी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम ठेवून भजनाचा उत्कृष्ट कार्यक्रम ठेवून मनोभावे आरती करून पुष्पवृष्टी करून नृसिंह जयंती साजरी केली. तसेच रजपूत यांच्या वाड्यात व मारुती देशमुख यांच्या वाड्यातही व अनेक ठिकाणी नृसिंह जयंती साजरी केली. वरील सर्व ठिकाणी आरतीनंतर प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता झाली. वरील सर्व ठिकाणी भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |