कणकवली नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आचारसंहितेमुळे रद्द

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 22 May 2026 | 👁 244 Views
कणकवली नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आचारसंहितेमुळे रद्द
पुढील तारीख लवकरच कळविली जाणार असल्याचे प्रशासनाची माहिती
कणकवली नगरपंचायतीतर्फे इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आयोजित करण्यात आलेला सत्कार समारंभ आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी गुरुवार दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आचारसंहिता लागू झाल्याने सदर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

कार्यक्रमाची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही नगरपंचायत प्रशासनाने सांगितले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |