“शब्द दिला.आणि पाणीही दिलं!”तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित; २१ गावांचा पाणी प्रश्न अखेर मार्गी आमदार अमोल खताळ पाटील

👤 संकेत तुकाराम सानप (मुंबई मंत्रालय) | 📅 22 May 2026 | 👁 260 Views
“शब्द दिला.आणि पाणीही दिलं!”तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित; २१ गावांचा पाणी प्रश्न अखेर मार्गी आमदार अमोल खताळ पाटील
संगमनेर तालुक्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला अखेर गती मिळाली असून, २१ गावांच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सहकार्याने तसेच आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना अखेर कार्यान्वित झाली आहे.
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही परिसरातील हजारो नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरणारी योजना मानली जाते. मागील काही काळापासून विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे या योजनेचे काम रखडले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या पुढाकारामुळे आणि प्रशासनाच्या समन्वयातून अखेर या योजनेतून जलप्रवाह सुरू करण्यात आला.
निंबाळे शिवारातील प्रवरा नदीकाठच्या पंपिंग स्टेशनमधून वडगाव पान येथील साठवण तलावाकडे पाणी सोडण्यात आले असून, त्यामुळे तळेगावसह परिसरातील २१ गावांच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक गावांमध्ये आता नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत योजनेची पाहणी करण्यात आली. कामात कोणतीही दिरंगाई होऊ नये, नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा आणि भविष्यात पाणी प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ग्रामीण भागातील नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे. “दिलेला शब्द पाळत लोकांच्या पाणी प्रश्नासाठी प्रभावी काम करण्यात आले,” अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नसून ग्रामीण भागातील शेती, जनावरे आणि दैनंदिन जीवनालाही मोठा आधार मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |